पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- चिकनगुनियाचे तांडव सुरू आहे. घरोघरी रुग्ण आहेत. चिकनगुनिया, डेंग्यू पाठोपाठ आता स्वाइन फ्लूने नागरिकांत मोठ्या प्रमाणात खळबळ माजवली आहे. त्यामुळे नागपूरकर दहशतीत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे महानगर पालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणाला त्यादृष्टीने तयार करायला पाहिजे होती पण महानगर पालिका फक्त जनजागृती करून स्क्रिनिंग करत आहे.
नागपूर महानगर पालिका नोंदीनुसार नागपुरात आतापर्यंत 161 स्वाइन फ्लू बाधित रुग्ण समोर आले आहे. त्यात 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. 17 स्वाइन फ्लू बाधित रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. यात शहरातील 10 रुग्ण आहेत. पण नागपूर महानगर पालिकाकडे या रुग्णांवर उपचाराची यंत्रणाच नसल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात साथीचे रोग मोठ्या प्रमाणात प्रसरतात त्यामुळे या रोगांवर नियंत्रण करणे आणि नागरिकाच्या उपचाराची जबाबदारी महानगर पालिकेची असते. परंतु नागपूर महानगर पालिका केवळ जागृती करणे हाच अजेंडा घेऊन काम करीत आहे. मागील 4 महिन्यात 620 रुग्ण आढळले. याच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही समाधानाची बाब आहे. मात्र स्वाइन फ्लूचे नागपूर शहरातील 4 आणि ग्रामीण भागातील 4 मृत्यूची नोंद महापालिकेच्या डेथ ऑडिट कमिटीने केली आहे. डेंगीचे 134 रुग्ण आढळले आहेत.
नागपूर जिल्हात स्वाइन फ्लूचे 161 रुग्ण, 15 मृत्यू: नागपुरात स्वाइन फ्लूच्या 161 रुग्णांमध्ये शहरातील 91 आणि ग्रामीण भागातील 24 असे जिल्ह्यात 115 रुग्ण आढळले. यातील ८ जनाचा मृत्यू झाला आहे.
उपचार न करता होते ‘डेथ ऑडिट’: नागपूर महापालिकेतील एकाही रुग्णालयात स्वाइन फ्लू रुग्णाला दाखल करण्याची सोय उपलब्ध नाही. तशी यंत्रणाच कधी तयार केली नाही. स्क्रिनिंगचे काम तेवढे मनपाच्या विविध आरोग्य केंद्रांसह रुग्णालयात होते. उपचार खासगी किंवा मेयो, मेडिकलमध्ये होतात. मात्र स्वाइन फ्लू बाधिताच मृत्यू झाल्यानंतर मात्र मृत्यूचे विश्लेषण (डेथ ऑडिट) करण्याची जबाबदारी महानगर पालिका आरोग्य विभाग चोख बजावतो.

