पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेल्या बेपत्ता असलेल्या एकूण ४६४ व्यक्तींचा एक वर्षेच्या आत शोध लावून त्यांना सुखरुप कुटुंबियांच्या दिले ताब्यात भोसरी पोलीस ठाणेच्या कौतुकास्पद कामगिरीने मिळून आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी मानले पोलीसांचे आभार.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस तपासावरील हरवलेले, बेपत्ता असलेले पुरुष, महिला, लहान गुले यांचा तात्काळ शोध लागावा यासाठी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे यांनी पोलीस ठाणेस्तरावर विशेष मोहिम राबवून शोध घेण्यात यावे असे सुचना दिलेने मोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भास्कर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली भोसरी पोलीस स्टेशन अंतर्गत मिसींग व्यक्तींचा तात्काळ शोध लागावा या अनुषंगाने विशेष शोध पथक तयार करण्यात आले. स्थापन करण्यात आलेल्या शोध पथकातील पोलीस अंमलदार सचिन जाधव बने २४२१ यांनी भोसरी पोलीस स्टेशन येथे अभिलेखावरील मागील ०७ वर्षांतील असणा-या तसेच पोलीस स्टेशन येथे दाखल होणा-या मिसिंग मधील पुरुष, महिला, लहान मुले यांचा तांत्रीक विश्लेषनाव्दारे व इतर तपासकौष्यल्य वापरून एक वर्षा पेक्षा कमी कालवधी मध्ये एकुण ३०९ हरवलेले तसेच बेपत्ता असलेले पुरुष, महिला, लहान मुले यांचा यशस्वी शोध घेतलेला आहे. तसेच दि. ११/०७/२०२२ ते दि.१६/०७/२०२२ या कालावधीमध्ये मिसींग ड्राईव्ह आयोजित करून भोसरी पोलीस स्टेशनकडील एकून ४० पोलीस अंमलदारांनी २०० पैकी १५५ मिसींग व्यक्तींचा शोध लावून त्यांना त्यांचे कुटुंबियाकडे सुखरूप सुपूर्द केलेले आहे. अशा प्रकारे भोसरी पोलीस ठाणेकडील एकुन ४६४ मिसींग व्यक्तींचा शोध घेण्यात भोसरी पोलीसांना यश आले असुन मिळून आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी पोलीसांचे आभार मानत कौतुक केले आहे. सदरची कामगिरी मा. श्री. अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त श्री. मंचक इप्पर पोलीस उप-आयुक्त परि १ श्री. डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग भोसरी पोलीस ठाणेचे व. पो. नि. श्री. भास्कर जाधव श्री अरविंद पवार पो. नि. (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली भोसरी पोलीस ठाणेकडील विशेष शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंगलदार यांनी केली आहे. यामध्ये तांत्रीक विश्लेषन करिता चिंचवड पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंगलदार जामदाडे व.नं १६२० नेम यांनी विशेष मदत केली आहे.
(रावसाहेब जाधव) वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी पिंपरी चिंचवड