अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धा वर्धा पार पडली. या स्पर्धेत डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट चे 10 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत विभागीय स्तरावर 9 खेळाडूंची निवड झाली.
यात 1)कु.नव्या स. कोल्हे वर्ग 8 वा 2) कु.मानसी शेराम वर्ग 9 वा 3)कु.चंचल अ.कापसे वर्ग 9 वा 4) कू.अनुष्का सु सोमलकर वर्ग 12 वा 5) मेघराज तराळे वर्ग 8 वा 6) कार्तिक दखने वर्ग 8 वा 7) युवराज वंजारी वर्ग 7 वा 8) अर्पित ईजमूलवार वर्ग 9 वा 9)रोहित राजेश मुळे वर्ग 12 वा इत्यादीचा समावेश आहे.
या यशस्वी खेळाडुंचे संस्था सचिव अनिल जवादे, प्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत नगराळे, उपमुख्याध्यापिका सुनिता खैरकार, उप प्राचार्य नानोटकर, पर्यवेक्षक दिनेश वाघ, रविंद्र शिरपूरकर, विलास भोमले तथा प्रशिक्षक अजय मुळे व क्रीडा विभागाचे प्रमुख गोपाल मांडवकर, डॉ. पंकज ठाकरे, स्वाती माटे, धनंजय कापसे, राहुल गिरडे, चेतन पाटील, प्रतीक पाटील ,सुरेखा मेश्राम, मिना भगत, जोत्सना धोटे, शिल्पा बांगरे , प्रशांत पाटील, पपेश मुंजेवार, दिनेश बागेसर,याना समोरील, वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.