मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभेच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. घरघुती गणपती सजावट स्पर्धेत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील दोनशे पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी याबक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्यांचा आत्मविश्वास वाढवत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह सहकार नेते वासुदेवजी गौळकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथम पुरस्कार पंकज भट्ट यांच्या तर्फे शरद लोणकर, द्वितीय पुरस्कार सुशील घोडे यांच्या तर्फे पूजाताई कुंभारे, तृतीय पुरस्कार नितीन भुते यांच्या कडून शुभम पालेकर, चतुर्थ पुरस्कार रविकिरण कुटे कडून शुभम शेंडे, पंचम पुरस्कार सुशील घोडे कडून अविरत राऊत यांना देण्यात आला.
यावेळी मंचावर ईरा अर्बन बँकेचे संचालक सपना जाना, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, युवक जिल्हा अध्यक्ष प्रणय कदम, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे, श्रीकांत भगत, आकाश दाते, ऍड संदीप विरुळकर, अमोल झाडे, शहर कार्याध्यक्ष सिमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष शितल तिवारी, जिल्हा सचिव सुचिता सातपुते, अमिता पूंनवटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महासचिव राजू मुडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुशील घोडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल जाधव,तालुका संघटक पंकज भट्ट, तालुका सचिव वैभव साठोने, तालुका अध्यक्ष रविकिरण कुटे, आकाश हूरले, विपुल थुल, आकाश थुल, वैभव भुते, मनीष मुडे, निखिल ठाकरे, स्वप्नील पांडे आदींनी परिश्रम घेतले.