अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट वासियांचे स्वप्न, हिंगणघाट शहर व तालुक्यातील बेरोजगारांना मिळणारी रोजगाराची संधी, अश्या मेडिकल कॉलेज ला जाम ला पळवून नेले. हिंगणघाटच्या जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. मेडिकल कॉलेज साठी 205 दिवस चाललेल्या आंदोलनाची थट्टा उडवली. या विरोधात शहरा मध्ये ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
जाम येथे मंजूर झालेला मेडिकल कॉलेज चा आदेश त्वरित रद्द करण्यात यावा आणि मेडिकल कॉलेज परत हिंगणघाटला खेचून आणावे अन्यथा या संदर्भात रवी चंद्रभान कांबळे यांनी 15 सप्टेंबर ला आमदार समीर कुणावर यांच्या निवासस्थाना पुढें आत्मदाह करण्याचा इशारा दिला होता.
हे मेडिकल कॉलेज हिंगणघाट येथे झाले पाहिजे अन्यथा करो या मरो ही भूमिका रवि कांबळे वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट शहर प्रमुख यांनी घेतली होती.
परंतु पोलीस विभागाने रवि कांबळे यांना आंदोलनापूर्वी ताब्यात घेतल. प्रशासनाने सांगितलेल्या प्रमाणे कायदा व सुव्यवस्था हातात न घेण्याची विनंती चा मान ठेवून रवि कांबळे यांनी आजच्या आत्मदहनाच्या आंदोलनाला स्थगिती दिली आहे. तरीही यापुढे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहणारच आहेत. येत्या काही दिवसात मेडिकल कॉलेज हिंगणघाटला आणण्या करिता उपविभागीय अधिकारी यांचा कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

