रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- शनिवार, 14 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कबीरांचे दोहे, पाठ्यपुस्तकातील हिंदी कविता, स्वरचित हिंदी कविता, हिंदी दिनावर आधारित पोस्टर्स, हिंदी कथा, हिंदी घोषवाक्य, हिंदी सुविचार, शाळेत हिंदी निबंध सादर केले.
राष्ट्रीय हिंदी दिवस हे आपल्या भाषेचे महत्त्व आणि मूल्य दर्शवणारे प्रतीक आहे. शतकानु शतके हिंदी हे लोकसंख्येसाठी संपर्काचे माध्यम आहे आणि म्हणूनच ती 14 सप्टेंबर 1949 रोजी भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली गेली. हिंदीला भारतीय संविधानानुसार राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. त्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.