अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सिटी मॉन्टेसरी स्कूल, लखनऊ येथे सोळावे मॅकफेयर २०२४ नुकतेच पार पडले. यात हिंगणघाट येथील भवन्स गिरधरदास मोहता विद्या मंदिर मधील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या यथार्थ कौस्तुभ जनईकरने व इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या अश्विन प्रवीण बिडकर यांनी सहभाग नोंदविला.
सोळावे मॅकफेयर २०२४ मध्ये डेस्कार्टिस कोर्डिनेट्स या गणित विषयाच्या प्रतियोगितेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत यथार्थ कौस्तुभ जनईकरने व अश्विन प्रवीण बिडकर यांनी दुसरा क्रमांक पटकविला. या चमूचे मार्गदर्शन तुषार देशमुख यांनी केले. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी पालक, शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापिका तमगिरे मॅडम, डायरेक्टर आशिष कुमार सरकार सर यांना दिले.