पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील पारडी भागातील आभानगर परिसरात घरात प्रवेश करून एका 9 वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना रविवारी दिनांक 15 सप्टेंबरला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्या अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन 9 वर्षाची असून ती तिसऱ्या वर्गात शिकत असून तिला एक लहान बहीण आहे. पिढीत मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करतात. रविवारी दुपारच्या सुमारास आई वडील दोघेही कामावर गेले असताना, एक 35 वर्षीय अनोखळी व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या घरी आला. यावेळी पिढीत आपल्या 4 वर्षीय लहान बहिणीसह घरात होती. यावेळी आरोपीने या दोघींनाही चॉकलेट देत, मुलीला विचारले की वडील घरी आहेत का? त्यानंतर आरोपीने बहिणीला घरा बाहेर ठेवून आत खोलीत गेला. त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केला. त्यामुळे ती रडू लागली. तेव्हा त्याने तिला 20 रुपये देत तेथून पळ काढला.
सायंकाळी पिढीत मुलीचे आई-वडील कामावरून घरी आल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांचा पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर पालकांनी तिला घेऊन पारडी पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी जारी केले आरोपीचे रेखाचित्र: पोलिसात तक्रार देण्यासाठी आई-वडील मुलीसह आले असता, त्यांनी व्यक्तीबाबत विचारणा केली, मात्र, दोघींनीही तो ओळखीचा नसल्याचे सांगितले. त्यानुसार, त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिस यंत्रणेद्वारे आरोपीचे एक रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. या आधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.