अहेरी: संपूर्ण भारत देशात स्वांतञ्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो तसेच देश शस्वत विकासाचे ध्येय पूर्ण करायाला स्पर्धा करतोय तर दूसरीकडे अहेरी तालूक्यातील चिरेपल्ली ,पत्तीगाव कोत्तागूड्डम मरनेली ही गावे अध्यापही विकासापासून वंचित आहे या गावाना जोडणारा पक्का रस्ता आजपर्यंत झालेला नाही.असे अनेक समस्या घेऊन वरिल गावातील नागरिकांनी मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेब अहेरी यांचे मार्फत मा.मूख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन पाठवण्यात आला.या निवेदनत म्हटले आहे की खांदला ते चिरेपल्ली व मरनेल्ली रस्ता मंजूर करून तत्काळ डांबरीकरण करून देण्यात यावे व त्यापूर्वी तात्पूर्ती पूर्ण रस्ता दूरूस्ती करून देण्यात यावी अन्यथा आगामी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल .असे निवेदनातून म्हटले आहे.निवेदन देतांना श्री भगवान मडावी ,दूर्गा आलाम, नारायण आत्राम, नारू पेंदाम, नामदेव पेंदाम, तूकाराम आलाम, संजू तलांडी, दौलात कोडापे. आदि बहूसंख्येने उपस्थित होते.