राजुरा (ता.प्र) :– भगवान विश्वकर्मा महापुजन दिवसाचे औचित्य साधून संविधान चौक राजुरा येथे झाडे सुतार समाज राजुरा यांच्या वतीने भगवान विश्वकर्मा महापुजन व महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी महापुजन कार्यक्रमाला हजेरी लावून भगवान विश्वकर्मा यांचे दर्शन घेतले आणि समाज बांधवांना भगवान विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, झाडे सुतार समाजाचे माजी अध्यक्ष बंडूजी माणूसमारे, माजी अध्यक्ष गजानन भटारकर, महेंद्र बुरडकर, अंकुश कायरकर, सचिन भटारकर, हितेश जयपुरकर, तुकाराम सोनटक्के, विशाल जानवे, संतोष चंदनखेडे, किशोर हिंगाणे, नितीन जयपुरकर यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.