नांदेड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नांदेड:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सर्व्हिस रिवॉलव्हरने आपल्याच पत्नीला गोळी झाडत तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. अफजल पठाण असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नांदेड येथील पोलीस अमलदार असलेल्या अफजल पठाण हे विमानतळ पोलिस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकात कार्यरत आहेत. अफजल पठाण आपल्या घरी धनेगाव येथील आयडीयल कॉलनीत सायंकाळी 6.00 वाजताच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर अफजल पठाण यांनी आपल्या शासकीय बंदुकीतून आपल्याच पत्नीवर गोळीबार केला. या गोळीबारात पठाण यांच्या पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आपल्या ताप्या सह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अफजल पठाण यांचा पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. यावेळी पोलिसांनी अफजल पठाणला ताब्यात घेतले. दुसरीकडे पत्नीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पठाण यांनी असे का केले याचा तपास पोलीस करत आहेत.