अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट द्वारा संचालित ब्रिलीअंट सीबीएसई स्कूल हिंगणघाट येथे हिंदी दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून अभय दांडेकर मुख्याध्यापक ब्रिलीअंट स्कूल हिंगणघाट तर अतिथी म्हणून डॉ. सपना जयस्वाल उपप्राचार्य मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी हिंदी दिवस निमित्त हिंदी भाषेचे महत्त्व गीत आणि नृत्याच्या माध्यमातुन सर्वांसमोर मांडले. यावेळी डॉ. सपना जयस्वाल यांनी हिंदी ही जीवनाची भाषा बनल्यामुळे हिंदी भाषेशिवाय कोणतेही काम पुर्ण होवू शकत नाही असे प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय मनोगतातून अभय दांडेकर यांनी हिंदी भाषेचे आपल्या जीवनातील महत्त्व यावर विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन हिंदी विषय शिक्षिका विद्या येनोरकर यांनी केले तर आभार सुनल काळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले