क्रांतीची लाट उठविणाऱ्या गावात मुक्तीसंग्राम दिनाचा जल्लोष.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा मुक्तीसंग्राम दिन उत्सव समिती व ऍड. संजय धोटे मित्र परिवार यांच्या वतीने नलफडी गावातील चौकात राजुरा मुक्तीसंग्राम दिन जल्लोष सोहळा घेण्यात आला. यावेळी मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात सहभागी असलेल्या मृताकांच्या परिवारातील सदस्यांना व परिसरातील जेष्ठ नागरिकांचा शॉल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबा धोटे, अध्यक्ष, मुक्तीसंग्राम दिन आयोजन समिती नलफडी यांची उपस्थिती होती. तर उदघाटक म्हणून ऍड. संजय धोटे, माजी आमदार राजुरा तथा कार्याध्यक्ष आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांची उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून अविनाश जाधव, माजी जी. प. सदस्य तथा सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, प्रमुख अतिथी म्हणून ऍड. अरुण धोटे, डॉ. उमाकांत धोटे, जेष्ठ पत्रकार, सतीश धोटे, अध्यक्ष, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, अमित टेकाम, सरपंच, ग्रा. पं. नलफडी, प्रभाकर धानोरकर, उप सरपंच, ग्रा. पं. नलफडी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोहपुरुष भारत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, छ. शिवाजी महाराज, भारत माता यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ऍड. संजय धोटे म्हणाले क्रांतीची लाट उठविणाऱ्या गावांत मुक्ती संग्रमाचा जल्लोष होतांना मला आनंद होतोय. अन्याया विरुद्ध लढा देणाऱ्याना मानाचा मुजरा करीत शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक उन्नती करणे हे माझे ध्येय असून प्रत्येकाच्या हाताला कामं ही संकल्पना मी पूर्णत्वास नेईल असे प्रतिपादन केले.
यावेळी अविनाश जाधव यांनी मुक्तीसंग्रामाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. आपल्या पूर्वजानी घेतलेल्या परिश्रमांची जाणीव युवा पिढीला व्हावी यासाठी असे कार्यक्रम गावागावांत होणे आवश्यक असल्याचे मत जाधव यांनी मांडले. राजुरा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात सहभागी असलेल्या शहिदाच्या परिवारातील सदस्यांना व परिसरातील जेष्ठ नागरिकांना शॉल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बादल बेले यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. अरुण धोटे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. राजुरा मुक्तीसंग्राम दिन आयोजन समिती नलफडी गावातील युवक मंडळी, ऍड. संजय धोटे मित्रपरिवार पदाधिकारी, कार्यकर्ते, मोहन धोटे, डॉ. अर्पित धोटे, विनोद धोटे, निखिल धोटे, अमय धोटे यांनी अथक परिश्रम घेतले.