अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथील प्रसिद्ध मूर्तिकार डॉ. प्रशांत ढोके यांचे स्टॉल वरून भाविकांनी गणपती मूर्ती खरेदी करून लकी ड्रॉ मध्ये नशीब आजमाविले. सावनेर येथे गेल्या 20 वर्षापासून गणपती विक्री स्टॉल लागत असून यावर्षी सुद्धा त्यांनी गणपती खरेदीवर लकी ड्रॉ कूपन योजना राबविली. नागपूर येथील रहिवासी बंटी चौधरी यांना अर्धा ग्रॅम सोन्याच्या गणपतीचे लॉकेट प्रथम बक्षीस मिळाले. दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सावनेर येथील राजेंद्र गढवाल यांना वीस ग्रॅम चांदीच्या गणपतीचे लॉकेट बक्षीस मिळाले तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस केळवद येथील शौर्य बनकर याला १० ग्रॅम चांदीची गणपती मूर्ती मिळाली.
या लकी ड्रॉ मध्ये गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला असून लकी ड्रॉचे हे दुसरे वर्ष आहे. पुढील वर्षी सुद्धा ही योजना राबविण्यात येईल असे मूर्तिकार डॉ.प्रशांत ढोके यांनी सांगितले. बक्षीस वितरण सामाजिक कार्यकर्ते श्री. शांतारामजी ढोके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मनोज बागडे व इतर गावकरी उपस्थित होते.