वैशाली गायकवाड, पुणे प्रतीनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- मागील काही काळापासून “महिलांवरील वाढते हिंसाचार पाहता महिलाना रात्री बाहेर पडायची भीती वाटते.” “या घटनांमुळे आम्हाला घरच्यांकडून सतत विचारणा होत असते, ‘कुठे आहेस? कोणाबरोबर आहेस? फार उशीर करू नकोस.” हे अनुभव अनेक महिलांना येत आहेत, एका मध्यमवयीन महिलेचा आणि दुसरा नुकत्याच नोकरीला लागलेल्या मुलीचा. त्या बोलत होत्या त्याला निमित्त होतं अभिव्यक्ती आयोजित महिला हिंसाचारविरोधी सडेतोड सडक नाटक ‘आता बास’ याचे. हे महिलांवरील वाढत्या हिंसाचारा विरोधात अभिव्यक्ती संघटना गणेश उत्सवात बाजीराव रोड येथे आता बास नावाचे नाटक सादर करण्यात आले.
हे नाटक महिलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या मुळाशी जी स्त्री पुरुष असमानतेची व्यवस्था आहे त्यावर बोलते. जे लोकांना प्रश्न पडायला उद्युक्त करते आणि स्त्री पुरुष दोघेही आपले, आपल्या आसपासचे अनुभव सांगतात.
या नाटकानंतर उपस्थित सर्वांना शपथ देण्यात आली, मी महिलांचा सन्मान करेन, मी महिलांशी आदराने वागेन महिलांवर होणारा हिंसाचार मी खपवून घेणार नाही. कोणत्याही ठिकाणी जर महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर मी त्याविरोधात आवाज उठवेन. अशी शपथ सर्व नागरिकांना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थीत होते, यावेळी स्त्री पुरुष समानता रुजवण्यासाठी काही आकर्षक खेळ खेळण्यातही नागरिक उत्तम प्रकारे सामील होत आहेत.