Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 19, 2024
in क्राईम, नाशिक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरा नगर परिसरातील सराफनगर भागात असलेल्या एका रो-हाऊसमध्ये पती – पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच खोलीत त्यांची 10 वर्षीय चिमुकली मुलगीसुद्धा पलंगावर मृतावस्थेत आढळून आली. विजय माणिक सहाणे वय 41 वर्ष, ज्ञानेश्वरी सहाणे वय 33 वर्ष, अन्यया सहाणे वय 10 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे.

दिनांक 18 सप्टेंबर बुधवारला सकाळच्या सुमारास घरा शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी जेव्हा दरवाजाला धक्के मारून उघडले, तेव्हा ही काळीज हेलावणारी घटना समोर आली. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या तीघांच्या आत्महत्येमागील गुढ कायम आहे.

इंदिरानगरमधील सराफ नगर हा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात प्रतिगंगा रो-हाऊसमध्ये सहाणे कुटुंबीय वास्तव्यास आहे. विजय सहाणे हे सातपूर एमआयडीसी मधील एका कंपनीत नोकरी करत होते. ते त्यांचे वृद्ध आई, वडील, पत्नी, मुलगीसह याठिकाणी वास्तव्यास होते. अज्ञात कारणातून त्यांनी तसेच पत्नीते स्वत:चे आयुष्य संपविले. या दोघांनी मिळून मुलीलाही ठार मारल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. मुलीच्या तोंडावर चिकटपट्टी लावलेली पंचनाम्यात आढळली, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमागील कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. घरात कुठल्याही प्रकारची चिठ्ठी वगैरे आढळून आली नाही, असे पोलिसांनी सांगितले. प्रारंभी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशी आली घटना समोर: बुधवारी सकाळी विजय सहाणे यांचे आई-वडिल उठले. माणिक सहाणे यांनी मुलाला व सूनेला हाका मारल्या मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून ते खालून वरच्या मजल्यावर त्यांच्या खाेलीचे दार वाजविण्या साठी गेले. जोरजोराने दार वाजवून सुद्धा कुठलाही प्रतिसाद आतमधून येत नसल्याचे बघून त्यांनी शेजारींची मदत घेतली. शेजारचे काही लोक त्यांच्या घरी आले. त्यांनीही दरवाजा जोरजोराने वाजविला. नंतर दरवाजाला धक्के देऊन तो तोडला. त्यावेळी छताला सुती दोरीच्या साह्याने पती-पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले अन खोलीतील पलंगावर मुलगीही निपचित पडलेली होती. तातडीने नागरिकांनी पोलिसांना माहिती कळविली.

Tags: 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.Nashik policeआत्महत्यागळफासनाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या
Previous Post

काँग्रेस ची 19 सप्टेंबर पासून जिल्ह्यात परिवर्तन यात्रा: शासकीय विश्रामगृहात खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत निर्णय. यात्रेच्या माध्यमातून राज्यातील महाभ्रस्ट महायुती

Next Post

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In