देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांकरिता महिलांकरिता अनेक योजना सुरू केल्या आणि त्या घोषणा प्रत्यक्षात अमलात येताना सुद्धा दिसत आहे, परंतु ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता सर्वसाधारण जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार धडपड करतो सर्वसाधारण जनतेला न्याय मिळवून देतो, शासनाच्या विविध योजना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार हा निस्वार्थ भावनेने करतो, अशा पत्रकारांना लाडला पत्रकार म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योजना सुरू करणार का अशी चर्चा पत्रकार क्षेत्रात होत आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात असे अनेक पत्रकार आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे त्यांना कोणत्याच प्रकारचे मानधन ही मिळत नाही त्या पत्रकारांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची स्थिती अशी असेल तर पत्रकारांनी कसे जगावे फक्त राजकारणी लोकांच्या बातम्या देऊन त्यांना प्रकाश झोतात आणून प्रसिद्धी द्यायची व मोठमोठ्या पदावर नेऊन त्यांना पोहोचवायचे मात्र या पत्रकारांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे, यापेक्षा शोकांतिका काय असू शकते. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांच्या बाबतीत सकारात्मक विचार करून लाडला पत्रकार योजना सुरू करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी साप्ताहिक जननायक आवाजचे मुख्य संपादक सोपान बेताल, टि. वी. देश दर्पण चे संपादक भाई सिरसाट पत्रकार संगीता तायडे सह पत्रकारांनी केली आहे.