मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
मोबाईल नं. 9420751809
तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी हे घसरून पडल्याने त्यांचे हात पॅक्चर झाला होता.
पॅक्चर हात उपचार करण्यासाठी गडचिरोली – चिमूर निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते लच्चा मडावी यांना पॅक्चर हाताची उपचार करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवडे, माजी जिप.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेता बानय्या जनगाम,काँग्रेस कॉमेटी सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, झिंगानूर ग्रापंचे उपसरपंच शेखर गणपुरापू,दुर्गेश लांबाडी, बाबुराव कुमरे, श्रीनिवास कुमरे,सुरेश कुमरीसह झिंगानूर परिसरातील आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.