वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कर्वेनगर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कर्वेनगर येथील उच्चभ्रू श्रीमान सोसायटीमध्ये अनैतिक संबंधातून एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या पतीची हत्या चक्क आपल्या पोटच्या मुलीसमोर केल्याचे समोर आले आहे. राहुल पंढरीनाथ निवगुंने वय 42 वर्षे असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, रात्री 12.30 वाजताच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. अज्ञात इसमांनी रात्रीच्या वेळी दरवाजा वाजवल्याने राहुल यांनी दरवाजा उघडला. मात्र आरोपींनी अचानक राहुल यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. दरम्यान राहुल यांनी आरडाओरडा केल्यानंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या. मात्र आरोपी तो पर्यत घरातील दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तूची लूट करुन पसार झाले होते.
अगोदर पोलिसांना ही घटना चोरीची वाटली. मात्र पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला असता अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. दोन्ही आरोपींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पूर्वीदेखील त्यांनी हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र मागच्या वेळी तो प्रयत्न फसला, अशी माहिती पोलिसांना दिली.
मुलीं देखत झाली वडिलांची हत्या: मृतक राहुल हा एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्यांला 3 मुली आहेत. यावेळी आरोपींच्या तोंडावर बुरखा असल्याने मुलींनी आरोपींना पाहूनही ओळखता आले नाही. डोळ्यासमोरच वडिलांची हत्या झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे.