मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर रस्त्यावर श्री झेरॉक्स अँड ऑनलाईन सेंटर चालविणाऱ्या महिलेचे दुकान 16 सप्टेंबर 2024 रोजी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी लोखंडी सबलने तोडफोड करण्यात आली होती. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली होती. यात भारतीय जनता पक्षाचे महामंत्री यात सामील असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे.
या प्रकरणी आज पिढीत महिलेने पत्रकार परिषद घेऊन आरोपी विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी केली. या पत्रकार परिषदेत म्हटल आहे की, श्री झेरॉक्स अँड ऑनलाईन सेंटर या व्यवसायातूनच माझ्या परिवाराचं उदरनिर्वाह चालते. सन 2000 पासून मागील 24 वर्षांपासून हा माझा व्यवसाय सुरू आहे. मी व्यवसाय करीत असलेल्या जागेचा नसून पट्टा देखील मागितलेला आहे. याबाबत उपविभागीय कार्यालयातून रिसर्च अहवाल देखील जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आला आहे. 16 सप्टेंबर 2024 रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान. दिनेश वर्मा, मुन्ना त्रिवेदी, अंकित त्रिवेदी, अनिल कावडकर आपल्या पाच सहा इतर सहकार्यासह माझ्या दुकानात दाखल झाले. व माझ्या दुकानाची सबलीने तोडफोड करू लागले. याबाबत मी लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रकार कैद देखील झाला आहे आणि या प्रकरणात हे सर्व गुंड माझं दुकान सबलीने तोडत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. यातील दोघे हे माझ्याच पक्षात काम करतात. मी मागील 25 वर्षांपासून भारतीय जनता पार्टी या पक्षात एकनिष्ठतेने काम करत आहे. माझ्याच दुकानात शेजारी 1995 ते 2004 पर्यंत झुणका भाकर चालवणाऱ्या यातील आरोपी मुन्ना त्रिवेदी यांच्याकडे या जागेचा ताबा होता.
2006 रोजी कोर्ट विद्यमान संजय दैने उपविभागीय अधिकारी यांनी आदेश पारित करत तो ताबा काढून घेतला. मात्र याच जागेच्या शेजारी माझं दुकान व्यवस्थित चालत असल्याने मनात राग असलेल्या मुन्ना त्रिवेदीने व दिनेश वर्मा याने माझं दुकान तोडण्याच्या दृष्टिकोनातून काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. यानंतर आता माझं दुकान सबलीने तोडून मला राजकीय दृष्ट्या पक्षाचं काम करण्यापासून थांबवण्याचा यांचा डाव होता. आमचे नेते आमदार समीर कुणावर यांच्या कानावर याबाबत संपूर्ण माहिती मी टाकली आहे. मात्र हे दोन्ही लोक आमच्या पक्षात असल्याने आमदार समीर कुणावर काहीही या प्रकरणात करणे शक्य होत नाही आणि याचाच फायदा घेत या दोन गुंडांकडून आपल्या इतर गुंड मित्रांच्या सहाय्याने माझा माझं दुकान फोडण्याचा डाव टाकण्यात आला व ते दुकान फोडण्यात देखील आलं.
या प्रकरणात मी हिंगणघाट पोलिसात गुन्हा नोंदविण्यासाठी केली असता. पोलिसांकडून मला सहकार्य करण्यात आलं नाही उलट आरोपींना याबाबत माहिती देऊन त्यांना पसार होण्यासाठी पोलिसांकडून मदत करण्यात आली. या प्रकरणात फक्त अदखलपात्र पुन्हा नोंदवला असल्याने हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. यामुळे या आरोपींना विरोधात सीसीटीव्ही फुटेजेसच्या माध्यमातून तपास करून दखलपात्र गुन्हा नोंदवीत त्यांना तात्काळ अटक करावी अशी माझी मागणी आहे.