मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात विविध व्यवसायिक अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू व्हावे याकरिता आमदार समिर कुणावार प्रयत्नशील आहे. नुकताच वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावला तर हिंगणघाट मध्ये औषधी निर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालयासाठी प्रयत्न सुरू होते आमदार कुणावार यांनी वारंवार पाठपुराव्याने हिंगणघाटच्या तुळसकर फार्मसी महाविद्यालयाला मान्यता प्राप्त होऊन बिफार्म, व डिफार्म ला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या व्यवसायिक शिक्षणाकरिता विविध अभ्यासक्रम सुरू व्हावे यासाठी आमदार कुणावार प्रयत्नशील होते वैद्यकीय महाविद्यालय, औषधी निर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालय, नसिंग महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय या करिता त्यांचे प्रयत्न सुरू होते नुकतेच वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले पण फार्मसी कॉलेजच्या मान्यतेसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या विद्याविकास शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. उमेश तुळसकर यांनी नवीन फार्मसी कॉलेज प्रस्ताव टाकला होता मात्र महाराष्ट्र शासनाने बॅन करून ठेवले होते तेव्हा आमदार समिर कुणावार यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत हिंगणघाटच्या तुळसकर फार्मसी कॉलेजला मान्यता मिळवून दिल्याने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नई दिल्ली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्रशास्त्र विद्यापीठ लोणरे महाराष्ट्र शासन यांचे कडून मान्यतेचे पत्र प्राप्त झाले आहे.
सदर तुळसकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हिंगणघाट मध्ये एमबीए, बीबीए, बीसीए, पाच विषयात एमएससी, बीए, बीकॉम, बीससी असे विविध अभ्यासक्रम सुरू आहे. सदर औषधी निर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालयाला परवानगी मिळाल्याने पुन्हा भर पडली आहे. आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नाने फार्मसी कॉलेज ला मान्यता मिळाल्याने विद्या विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग तुळसकर, सचिव डॉ. उमेश तुळसकर, डॉ. नयना शिरभाते यांनी त्याचे आभार मानले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा आभार मानले.