वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील येरवडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे माहेराहून पैसे व सोन्याचे दागिने आणण्यासाठी शारीरीक व मानसिक छळ करुन अन्नात विष कालवून मारण्याचा दोन वेळा प्रयत्न करुन विवाहितेला जीवे मारण्याची धमक्या दिल्या जात होत्या. सासरच्या मंडळींच्या सततच्या जाचाला कंटाळून अखेर विवाहितेने आत्महत्या केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. गौरी मनोज गायकवाड वय 36 वर्ष, रा. अहिल्या सोसायटी, आंबेडकर चौक, येरवडा असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
विवाहितेच्या आत्महत्या याप्रकरणी मृतक गौरीची आई उज्वला रमेश आडागळे वय 53 वर्ष, रा. कमेला कोंढवा यांनी येरवडा पोलिसां तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती मनोज सुरेश गायकवाड वय 37 वर्ष, सासू मंदा सुरेश गायकवाड वय 56 वर्ष, नणंद रेखा कांबळे वय 45 वर्ष, दीर आकाश सुरेश गायकवाड वय 26 वर्ष, सर्व रा. अहिल्या सोसायटी, येरवडा यांच्यावर विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2009 पासून 20 सप्टेबर 2024 पर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी गौरी गायकवाड हिला तिचा पती, सासू, नंणद, दीर हे वेळोवेळी घरात लहान सहान गोष्टींवरून घालून पाडून बोलत. जेवणा वरुन कुरापती काढत. माहेरी निघून जाण्यास सांगून तिचा शारीरीक व मानसिक छळ केला जात होता. माहेरहून पैसे व सोन्याचे दागिने आणण्यास सांगून तिला काही काम येत नाही, या कारणावरुन वारंवार त्रास देत असत. तिला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करत असत. तिच्या अन्नात विष कालवून तिला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केला गेला. तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या जाचाला कंटाळून 20 सप्टेबर रोजी गौरी हिने आत्महत्या केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.