प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २१ सप्टेंबर २०२४ ला हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील वेगवेगळ्या २ कोटी ९५.२५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला.
उद्यानातील तलावाचे नूतनीकरण, सौंदर्यीकरण, पाथवेचे बांधकाम:- १ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन. योग भवनाचे बांधकाम:- १ कोटी रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन. सायन्स पार्क व चाईल्ड राईट पार्क उभारणे:- २० लक्ष २५ हजार रुपयांच्या कामाचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
या वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधीतून सदर विकासकामे पूर्णत्वास जाणार असल्याने व प्रत्यक्षात साकार झाल्याने शहरातील जनतेने आमदार समीर कुणावर यांचे आभार व्यक्त केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आमदार समिर कुणावर यांनी मनोगत व्यक्त केले. आज या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवतांना पुढील २५ वर्ष याआपल्या लक्षात राहील की आजच्या दिवशी आपण सर्व इथे उपस्थित होतो. आणि शहराच्या महत्वाच्या उद्यानाच्या पावणे तीन कोटी रुपयांच्या विकासात्मक कार्याचा भूमिपूजन सोहळा पार पाडला.