अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत सक्षम महिला नागरी बँकेचे व्यवस्थापक अनिल बुरांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, तालुकाध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, शहराध्यक्ष बालू वानखेडे, चेतन काळे, रोशन थुटे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार अमर काळे यांनी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याने प्रभावित होऊन विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जुळणारा कार्यकर्ता हा तळगळातील कार्य करणारा असतो. आज या सरकारने सत्तेचा गैरवापर करीत हे सरकार स्थापन केले आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी, दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. बेरोजगार युवकांना रोजगारापासून वंचित रहावे लागत आहे. या केंद्र सरकार व राज्य सरकारला तोंडघशी पाडायला सर्व जनतेला एकत्रित येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी यावेळी केले.
यावेळी अनिल बुरांडे, देवेंद्रजी कुरेकार, सचिन नाईक, योगेश पानसे, अमोल बुरांडे, प्रिया बुरांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. सर्वांचे खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी राष्ट्रवादीचा दुपट्टा घालून पक्षात स्वागत केले.