Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

वारसाहक्काने राजकारणात आलेल्यांना मतदान करायचे नाही, तेव्हा असे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील: नितीन गडकरी

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 22, 2024
in देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
वारसाहक्काने राजकारणात आलेल्यांना मतदान करायचे नाही, तेव्हा असे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील: नितीन गडकरी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमी आपल्या परखड विचार, रोखठोक मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. कधी कधी तर ते आपल्या पक्षातील नेत्याच्या चुकांवर कटाक्ष करायला पण घाबरत नाही. आता परत त्यांनी राजकीय पक्षात सुरू असलेल्या घराणे शाहीवर भाष्य करत जनतेनेच अशा लोकांना मतदान करू नये असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ज्यादिवशी लोक ठरवतील की वारसाहक्काने राजकारणात आलेल्यांना मतदान करायचे नाही, तेव्हा असे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या विश्व व्याख्यानमालेच्या 8 व्या राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवाद कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा. त्याला तिकीट द्या किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात. जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत. ज्यादिवशी जनता ठरवेल की वारसा हक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही तेव्हा असे लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा-मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही. त्याने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणूकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी यांनी आयुर्वेदावर देखील भाष्य केले. आयुर्वेदात आणखी संशोधनाची आवश्यकता असून औषधांचे स्टॅंडर्डायझेशन व्हायला हवे. औषधांच्या गुणवत्तेवर भर द्यायला हवा. आयुर्वेदिक डॉक्टर असूनदेखील ॲलोपेथीची प्रॅक्टिस काही लोक करतात. ही बाब योग्य नाही. आयुर्वेद हे भारतीय संस्कृती व स्वाभिमानाचे प्रतिक आहे. हिमालयातील वनस्पतींवर संशोधन व्हावे. आपल्या देशापेक्षा जर्मनीत आयुर्वेदावर जास्त काम सुरू आहे. आपल्या लोकांनी देखील आयुर्वेदाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Tags: #Nitin gadkariminister Nitin GadkariNagpurतेव्हा असे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील: नितीन गडकरीवारसाहक्काने राजकारणात आलेल्यांना मतदान करायचे नाही
Previous Post

अहेरी तालुका पोर्टल पत्रकार संघटनाच्या कार्यकारणी गठीत अध्यक्ष पदी जावेद अली तर सचिव पदी मधुकर गोंगले यांची सर्वानुमते निवड*

Next Post

पुण्यात ईदच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये झेंडा फडकवताना दोघांना विजेचा झटका एकाचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात ईदच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये झेंडा फडकवताना दोघांना विजेचा झटका एकाचा जागीच मृत्यू.

पुण्यात ईदच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये झेंडा फडकवताना दोघांना विजेचा झटका एकाचा जागीच मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In