भारतीय युवक काँग्रेस ग्राम कमेटी डोंगरगावची कार्यकारिणी गठित.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन डोंगरगाव:- येथे राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या निर्देशनुसार तसेच काँग्रेस पक्षच्या आदेशानुसार ग्राम तिथे शाखा या अंतर्गत डोंगरगाव येथे ग्राम कमेटी ची स्थापना करण्यात आली कमेटीच्या अध्यक्षपदी क्रीष्णा शेडमाके यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्ष पदी गणेश राऊत आणि जितेंद्र पोतराजे व महासचिव पदी महेश मडावी व सचिव पदी आकाश वाढई यांची नियुक्ती करण्यात आली.
या सोबतच शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी व राजुरा विधानसभेत आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला व सदस्य पद स्वीकारले. यावेळी नामदेव सांगडे (उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी) यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र व पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीत राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. तुमच्या सार्थक मेहनतीने आगामी विधानसभा २०२४ मध्ये सुभाष भाऊ नक्की आमदार होणार असा विश्वास डोंगरगाव वासियांना दिला.
या प्रसंगी उपस्थित आदर्श वनकर उपाध्यक्ष तालुका काँग्रेस सोशल मीडिया गोंडपिपरी, नकुल चांदांगिरीवार अध्यक्ष युवा काँग्रेस ग्राम कमिटी धाबा, अनिल डोंगरे उपाध्यक्ष युवक काँग्रेस ग्राम कमिटी धाबा, प्रदीप खारकर सदस्य, रुपेश लोडल्लीवार सदस्य, अमित वाकुडकर सदस्य, राहुल गुंडावार, नितीन येलमुले, अनिल शेडमाके, अंबादास मडावी , संतोष शेडमाके, साईनाथ मडावी, रवी वाढई, प्रमोद मडावी, प्रमोद कोटरंगे, नितेश वाढई, कार्तिक ठाकूर व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.