संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- नुकत्याच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ने प्राविण्य विद्यार्थ्याची यादी प्रसिद्ध केली. त्यात श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा च्या कोमल चन्ने हिने विज्ञान देव तंत्रज्ञान विद्याशाखेतील बी. एससी. मधून दहावी मेरिट आली तसेच भौतिकशास्त्र विषया मध्ये विद्यापीठातून प्रथम आली आहे.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील बी. एससी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कोमल चन्ने हिने बी. एससी मधून विद्यापीठातून दहावी तर भौतिकशास्त्र विषया मध्ये प्रथम स्थान पटकाविले आहे. कोमल चे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तिच्या प्रविण्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, सचिव अविनाश जाधाव, सर्व संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. वरकड, उपप्राचार्य डॉ. खेरणी, प्रो. डॉ. विशाल दुधे, डॉ. भोंगाडे, डॉ. डांगे, प्रा. शंभरकर, प्रा. सुवर्णा नलगे, प्रा. बोरसरे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तीचे कौतुक व अभिनंदन केले.
कोमल ने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य वरकड, भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. खेरानी, प्रो. डॉ. दुधे, सर्व प्राध्यापकवृंद तसेच आपल्या आई वडीलाना दिले.