पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी
युनिट-३, गुन्हे शाखा, पुणे शहर
कोथरूड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १६० / २०२२ भादंविक ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचे अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट-३ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे हया घरफोडीच्या गुन्हयाचा समांतर तपास करत असताना, गुन्हे शाखा युनिट-३ कडील पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या बातमीवरून अट्टल घरफोडी करणारा पोलीस रेकॉर्डवरील शिकलगरी पाहिजे आरोपी व त्याचा साथीदार युवराज वसंत मोहिते, वय-३४ वर्षे, रा. मु. पो. तोडोली, ता. कडेगाव, जि. सांगली हे डुक्करखिंड, वेंडर फ्युचर बिल्डींगचे समोर, कोथरुड, पुणे येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. सदर बातमीचे ठिकाणी सापळा लावला असता दोन्ही आरोपी हे मोटर सायकलवरुन डुक्कर खिंडी कडुन महात्मा सोसायटीचे दिशेने जाणारे रोडने येत असताना, त्याने मोटर सायकलचे पाठीमागे बसलेला
रेकॉर्डवरील पाहिजे शिकलगरी आरोपी हा गाडीवरुन उडी मारुन टेकडीचे दिशेने टेकडीवर पळुन जात असताना, त्याचा पाठलाग करता तो टेकडीवरील झाडी मध्ये पळून गेल्याने तो मिळून आला नाही.
परंतु गाडी चालवत असलेला आरोपी युवराज वसंत मोहिते, वय-३४ वर्षे, रा. मु.पो.तोंडोली, ता. कडेगाव, जि. सांगली यांस मोटार सायकलसह जागीच ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने त्याचा साथीदार याचेसह मिळून पुणे शहर व परीसरात घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच घरफोडी चोरी करण्यासाठी आरोपीने पंढरपुर येथून एक मोटर सायकल चोरी केल्याचेही निष्पन्न झाले असून, त्याचेकडून सदरची मोटर सायकल हस्तगत करण्यात आली आहे. त्याचेकडून खालील प्रमाणे
गुन्हे उघडकीस आलेले आहेत. १) कोथरूड पोलीस ठाणे गु.र.नं १६० / २०२२ भादंविक ४५४, ४५७ ३८०
२) कोथरूड पोलीस ठाणे गु.र.नं ३२ / २०२२ भादंविक ४५४, ४५७, ३८० ३) कोथरूड पोलीस ठाणे गु.र.नं ११५/२०२२ भादंविक ४५४ ४५७, ३८० ५११, ३४
४ सिहंगड पोलीस स्टेशन गु.र.नं १२५ / २०२२ भादवि ३८०, ४५४, ४५७ ५) अलंकार पोलीस ठाणे गु.र.नं ८४ / २०२२ भादंविक ४५४, ४५७, ३८०
६) दत्तवाडी पो स्टे गु.र.नं -१३०/२०२२ भादवि कलम ४५४, ३८० 19 ) खेड पोलीस ठाणे पुणे ग्रामिण गु.र.नं ३५९ / २०२२ भादंविक ४५४४५७, ३८०
८) पंढरपुर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामिण गु.र.नं ८७६ / २०१८ भादंविक ३७९ सदर आरोपीकडून १८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दानिगे १७२ ग्रॅम चांदीचे दागिने, दोन मोटर सायकल असा मिळून एकुण ५०,०५,३२०/- रु किचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याचा एक साथीदार फरार आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक राहुल पवार गुन्हे शाखा युनिट-३, पुणे शहर हे करीत आहेत….
सदरची उल्लेखनिय कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदीप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे- १. श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३, वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता मोरे, पोलीस उप-निरीक्षक, अजितकुमार पाटील, पोलीस उप-निरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, रामदास गोणते सुजित पवार, किरण पवार, संजीव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रताप पडवाळ, सतिश कत्राळे, राकेश टेकावडे, साईनाथ पाटील, गणेश शिंदे, प्रकाश कट्टे, दिपक क्षिरसागर, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.