अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्काराचे एक विदयापीठ असते. विदयार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडविणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्य निर्माणाचे कार्य शिक्षक करित असतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजा समोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार म्हणुन शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक असते. बदलत्या शैक्षणिक धोरणांसोबतच स्वतःला बदलवून आव्हान पूर्ण करण्याचे कसब मिळविणे ही कला फक्त शिक्षकांमध्येच असते. समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पुरस्कार आवश्यक आहे. जो पुण्य करतो तो पृथ्वीतलावर शिक्षक म्हणून जन्म घेतो. मनुष्य निर्मितीच, आदर्श व्यक्ती घडविण्याच काम शिक्षक करीत असतो. जे शिक्षक या कामात स्वताला झोकून देतात त्यांचा गुण गौरव झालाच पाहिजे. सत्कारामुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते असे विचार नविण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 टॉक्सफोर्स सदस्य तथा सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य रा. तू.मा विद्यापीठ नागपूर चे अजय चव्हाण यानी व्यक्त केले. ते अभिनव सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशिय संस्था, हिंगणघाट अंतर्गत अभिनव विचार मंच तर्फे आयोजित राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय व शिक्षक ध्येय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार सभारंभ कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी मंचावर विद्या विकास संस्था, हिंगणघाट चे सचिव तथा मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य रा.तू मा. विद्यापीठ नागपूर चे डॉ. उमेश तुळसकर, हिंगणघाट पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी व गट समन्वय अधिकारी अरविंद राठोड, विद्या विकास संस्था, हिंगणघाट चे अध्यक्ष पाडुंरंग तुळसकर, शिक्षक ध्येय मासिकाचे जिल्हा उपसंपादक मिलिंद दिक्षित आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. उमेश तुळसकर म्हणाले शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रातील समर्पणच शिक्षकांचा खरा दागिना. शिक्षक हा अविरत कार्य करत असतो शिक्षकाचा एकच ध्यास माझा विद्यार्थी माझी शाळा. अरविंद राठोड म्हणाले समाजात सर्वच शिक्षकाच काम उत्कृष्ट असतेच पण काही शिक्षक समोर येत नाही. ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाले त्यांच्या पासून प्रेरणा घ्यावी. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक शरद ढगे, दिपाली सावंत तसेच वर्धा जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक शशीमोहन थुटे, गणेश नवघरे व शिक्षक ध्येय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्यामसुंदर मेघरे, विजय गावंडे, अनिल कानकाटे, यशवंत गडवार, डॉ. अनिस बेग, किशोर उकेकर, तथा माझी शाळा सुंदर शाळा म्हणून जि.प.प्राथमिक शाळा जांगोना आणि राज्यपातळीवर निवड झालेले खेडाळू ओजस नितीन सुकळकर, सक्षम महेन्द्र पर्वत या सर्व शिक्षक गण व विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवराच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम सुत्रसंचानल प्रा.अभय दांडेकर तर आभार शरद वाघमारे यानी केले. कार्यक्रमाला अशोक पिठठलवार ,माजी मुख्याध्यापक बळीराम चव्हाण, योगेश खोडे, यांच्या सह अन्य गणमान्य व्यक्ती व अभिनव विचार मंच हिंगणघाट, अभिनव महिला बचत गट हिंगणघाट, अभिनव सहाय्यता निधी हिंगणघाटचे शिलेदार उपस्थित होते.