अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे इंग्रजी विषयांतर्गत इंग्रजी विषयाचे अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उमेश तुळसकर उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांना भाषा कौशल्य विषयी विस्तृत माहिती दिली. मार्गदर्शक म्हणून डॉ. गणेश बेले सर उपस्थित होते. त्यांनी भाषा कौशल्यावर व्याख्यान केले विद्यार्थ्यांना भाषा कौशल्याचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाला कला विभाग प्रमुख भाग्यश्री साबळे, मराठी विभाग प्रमुख अजय बिरे, इंग्रजी विभाग प्रमुख संगीता लांडगे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमीर पटेल यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा मोरे बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी हिने केले तर आभार प्रदर्शन अनुराधा येलगुंडे बीए तृतीय वर्षाची विद्यार्थिनी यांनी केले. सर्व कला विभागातील प्राध्यापकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

