हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील पेलोरा गावा मध्ये मागील अनेक वर्षापासून अवैद्य दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील अनेक युवक हे व्यसनाधीन झालेले आहेत तर अनेक महिलांचे घर संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पेलोरा गावामध्ये अवैधरीत्या दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील महिलांनी दारू बंदी बाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे महिलांच्या व गावकऱ्यांच्या पुढाकाराने आज विनय गौंडा जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर जिल्हा, नितीन धार्मिक अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी गावातील सौ. संगीता पारखी सरपंच पेलोरा, सौ. देवकाबाई देरकर तंटामुक्ती अध्यक्ष पेल्लोरा, संध्या पेंदोर, सुरेखा पेंदोर व इतर गावकरी महिला युवक उपस्थित होते.