मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली जिल्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथील राजरत्न अलोणे व डॉ,स्वामी अलोणे यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रधान करण्यात आले आहे.
सामाजिक क्षेत्रात सतत कार्य करून अनेक जनतेला वृक्ष लागवट संदर्भात अनेक राज्यात प्रचार, प्रसार करत आज त्यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रधान करण्यात आले आहे.
वृक्षांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. वृक्ष पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच आर्थिक मदत देखिल करतात. याचे महत्त्व लक्षात घेऊन महागाव बु. ता. अहेरी जिल्हा. गडचिरोली येथील डॉ,स्वामी लालूजी अलोणे आणि मुलगा राजरत्न स्वामी अलोणे यांनी माई एग्रो प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आणि मार्केटिंग प्रा. लि. या कंपनीची स्थापना करून चंदन लागवडीसाठी लोकांना प्रोत्साहन देत आपल्या परिसरात एक लाख हुन अधिक चंदनाची लागवड करून आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी कार्यरत आहेत,यांच्या या कार्याला अनुसरून शनिवार दि. २१/०९/२०२४ रोजी पुणे येथे रॉयल कारभार प्रस्तुत भव्य दिव्य पुरस्कार सोहळा मध्ये प्रमुख पाहुणे गुरुवर्य मा. मोनालीताई विधाते पाटील, मा. प्रियंका वहिले, आयोजिका, मा. पियुष सजगणे, रील स्टार यांच्या शुभहस्ते कंपनी चे संचालक स्वामी लालूजी अलोणे आणि राजरत्न स्वामी अलोणे यांना उद्योगरत्न पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले. गडचिरोली जिल्यात सर्वत्र ठिकाणी शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.