हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- राज्याचे मंत्री सुधीर मुनमंटीवार यांचे खंदे समर्थक आणि विसापूर येथील भारतीय जनता पार्टी नेते संदीप पोडे यांनी विसापूर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा ठोकण्याचा इशारा दिलेला होता. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली होती. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय विसापूर प्रशासनाने संदीप पोडे यांना पत्र देत उपोषण थांबवण्याची विनंती केलेली आहे. व 26 तारीख सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत विसापूर मधील नळ सेवा सुरू होईल असे या पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.
भाजपा नेते संदीप पोडे व भाजपा कार्यकर्ते यांनी गावात ग्रामपंचायतच्या वतीने नळ सेवा देण्यात येत नव्हती म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती व ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली होती. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने नळ सेवा सुरळीत सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने ग्रामपंचायत कार्यालयाने दिलेल्या वेळेपर्यंत उपोषणाला स्थगिती देण्यात आलेली आहे तरी सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती दिली आहे.