मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचा सन्मान मेळावा.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- महायुती सत्तेत आल्यानंतर महिला सक्षमीकरणाचे अनेक निर्णय सरकारने घेतले आहे. यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद बघून विरोधक खोडा निर्माण करीत आहेत. योजना बंद पडेल महिलांना लाभ मिळणार नाही असा आरोप विरोधकांनी केला मात्र भाजपचे सरकार तुमच्या पाठीशी असून योजना बंद पडणार नाही अशी ग्वाही सावनेर कळमेश्वर विधानसभा योजना समिती अध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी दिली.
सावनेर येथील प्रसंग सेलिब्रेशन सभागृहात भाजपच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांचा सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले तालुक्यात ८५ हजार पेक्षा अधिक महिलांची नोंदणी असून ७५ हजार महिला लाभास पात्र ठरल्या आहेत यात अनेक महिलांना लाभ मिळाला असून काही महिलांचे केवायसी, खात्याला आधार कार्ड लिंक नसने अशा काही अडचणी दूर झाल्यानंतर लाभ मिळणार आहे. याप्रसंगी भाजपचे वक्ते डॉ. राजीव पोतदार,रामराव मोवाडे,प्रकाश टेकाडे, मीना तायवाडे आदींनी विरोधकांचा समाचार घेत योजना दीर्घकाळ टिकवण्यासाठी भाजपला भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजीव पोतदार होते. तर मीना तायवाडे, उज्वला लांडे,माजी नगराध्यक्ष रेखाताई मोवाडे,रामराव मोवाडे,प्रकाश टेकाडे,संजय टेकाडे,मनोहर कुंभारे,अशोक धोटे,इमेश्वर यावलकर,डॉ.विजय धोटे,मंदार मंगळे,किशोर चौधरी,आशिष फुटाणे,राजू घुगल,तुषार उमाटे,विजय देशमुख,भारती आठनकर,किशोर मुसळे, ,वैशाली कोहळे,वनिता घुगल,स्वाती कामडी,तेजस्विनी लाड,माया शंभरकर,माया मंगळे मंचावर उपस्थित होते.
तालुकास्तरीय मेळाव्याला मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी उसळली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र ठाकुर,पिंटू सातपुते,सुजीत बागडे,रविंद्र ठाकूर,विजय लाड,विलास कामडी,दिवाकर नारेकर,अरविंद ताजने,दिगांबर सुरतकर,राजू भुजाडे, शालीक मोहतुरे,निखिल पोटभरे,केसरीचंद हिराले,रतन खंगारे,अंकित सातपुते,मनीष खंगारे,मोहन कानफाडे,रत्नाकर ठाकरे, प्रमोद पारधी,बंटी सातपुते, प्रमोद खुरसुंगे,मनोज जुनघरे, रविंद्र कठाडे,प्रकाश उबगडे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन रेखा पोटभरे यांनी केले तर सोनू नवधिंगे यांनी आभार मानले.