भंडारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना आहे. येथील जांभोरा गावात एका मुलीच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमात जेवणातून 50 पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जांभोरा या गावात राहणाऱ्या राजकुमार गहाणे यांच्या मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम 22 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान तयार करण्यात आलेल्या भाजीमध्ये पाल पडली. मात्र याबाबत कुणालाही माहीत पडल नाही. हीच भाजी सर्व नागरिकांना जेवणात वाढण्यात आली. साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आलेले सर्व पाहुणे जेवण करून गावाकडे गेले. परंतु गावातील नागरिक सायंकाळच्या दरम्यान जेवण करुन आपल्या घरी गेले असतांनासुद्धा विषबाधा झाल्याचा प्रकार दिसून आला नाही. काहींना थोडा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचार केला. दोन दिवसांनंतर बहुतेक नागकिरांना हगवण, उलटीचा त्रास होऊ लागल्याने गावात चर्चा होऊ लागली. तर 24 सप्टेंबर रोजी अनेक महिला- पुरुषांना पोटदुखी, उलटीचा त्रास जाणवू लागल्याने आरोग्य अधिकारी निषा पांडे व डॉ. सोनवणे यांना माहिती दिली असता जांभोरा येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये कॅम्प लावण्यात आले.
पन्नासच्या जवळपास नागरिकांचे औषधोपचार करण्यात आले. एक रुग्ण शिरीष चंद्रभान गहाणे वय 17 वर्ष या मुलाला शासकीय रुग्णालय भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून 36 रुग्णांची आरोग्य अधिकारी डॉ. निषा पांडे, डॉ. सोनवाने, आरोग्य सेविका स्वाती मरस्कोले यांनी औषध उपचार केले असल्याने सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र विषबाधा कशामुळे झाली याचे अद्याप कारण कळू शकले नाही.