राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. त्यात काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्ष आणि युतीला सपाटून मार खावा लागला होता. लोकसभा निवडणुक निकालाची पुनरावृत्ती विधानसभेत होता कामा नये यासाठी भाजप हायकमांड आता सतर्क झालं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत अनुसंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. काही दिवसांपासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यानंतर आता अमित शहा महाराष्ट्राच्या राज्याच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी सभा घेत भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत आहे.
अशातच अमित शहा यांनी आगामी विधानसभेला महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या संकेतामुळे भाजप आमदारांना धडकी भरली असून अनेकांची झोप उडाली आहे. अमित शहा यांनी नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील बैठकीत गुजरात पॅटर्नचा किस्सा देखील सांगितला आहे.
यावेळी काय बोलले अमित शहा?: “जेव्हा मी ३५ वर्षांचा होतो, तेव्हा विधानसभा निवडणुकीत पक्षाने माझे तिकीट कापले होते. त्यावेळी भाजपचे अध्यक्ष कुशालभाऊ ठाकरे माझ्याकडे आले होते. तेव्हा मी खूप दु:खी आहे असं त्यांना सांगितलं. तेव्हा तू अजिबात पक्षाचा प्रचार करू नकोस. दु:खी मनाने कोणताही माणूस चांगले काम करू शकत नाही”, असं ठाकरेंनी आपल्याला सांगितल्याचं अमित शहा म्हणाले.
एखादा नेता जर पक्षाने तिकीट कापल्यावर नाराज असेल तर त्याची घरी जाऊन समजून काढावी लागते, तो कार्यकर्ता नाहीच असं कुशाल ठाकरे मला सांगून गेले आहेत, असा किस्सा अमित शहा यांनी सांगितला. दरम्यान, अमित शहा यांच्या या उदाहरणामुळे विधानसभेत महाराष्ट्रात देखील गुजरात पॅटर्न लागू होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपचा गुजरात पॅटर्न काय?: 2022 मध्ये गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपवर मतदारांची मोठी नाराजी होती. त्यामुळे भाजप नेतृत्त्वानं 99 विद्यमान आमदारांपैकी तब्बल 58 आमदारांचे तिकीट कापले होते. या जागेवरून भाजपने नवीन उमेदवार उभे केले, ज्यांच्या झोळीत मतदारांनी भरभरून मतदान केले. महाराष्ट्रात भाजप आमदारांची संख्या 103 इतके आहे. म्हणजेच 50 ते 60 आमदारांना पुन्हा तिकीट मिळण्याची अत्यंत कमी शक्यता आहे. हे आमदार नेमके कोण असतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.