विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- नगरपंचायत अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात नगरपंचायतच्या सहाही गावातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना सृढ शरीर लाभावे याकरिता नगरपंचायत प्रशासनाने नागरी दलितेतर सुधार योजने अंतर्गत नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करून तिथे व्यायाम शाळा सुरू करण्यात आली. सदर व्यायाम शाळेचे लोकार्पण करण्यासाठी नागरिकांनी वारंवार मागणी केले असता त्यांच्या मागणीची दखल घेऊन लोकार्पण केल्याने व्यायाम प्रेमी व युवकांना आंनद झाले आहे.
सदर लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला उदघाटक म्हणून रेखाताई मोहूर्ले नगरसेविका तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली तसेच नामदेव हिचामी पाणीपुरवठा सभापती न.पं. एटापल्ली, नगरसेवक सर्वश्री निजान पेंदाम, राहुल कुळमेथे, निर्मला हिचामी, निर्मला कोंडबतुलवार, मुख्याधिकारी प्रणय तांबे सह अभियंता विवेक साखरे, शहर समन्वयक अक्षय पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
या व्यायाम शाळेचे उपयोग करून सर्वांनी स्वतःचे शरीर स्वस्थ व सृद्ढ ठेवावे असे आवाहन बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार यांच्या कडून करण्यात आले.