मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नगरपालिका हिंगणघाट प्रांगणात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगोरात्थान महाअभियानांतर्गत हिंगणघाट पाणीपुरवठा योजनेकरीता वणा नदीवर ४७कोटी ३० लक्ष रूपये किंमतीचा बंधारा बांधकामांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रेम बंसतानी, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, अभियंता प्रांजली टोंगसे, माजी न.प. उपाध्यक्ष चंद्रकांत मावळे, माजी नगरसेवक प्रा. किरण वैद्य यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार कुणावार यांनी बंधारा कश्या पद्धतीने मंजूर करून आणला याबाबत माहिती उपस्थितांना दिली हिंगणघाट येथील बंधारा मंजूर करून आणणे हि काय सोपी बाब नव्हती या बंधारासाठी सुमारे १५ वर्षा आधी ५ कोटी रुपये मंजूर झाले होते मात्र तत्कालीन नगरपरिषद नगर परिषद प्रशासनाच्या काळात बंधारा बांधकामांची गुणवत्ता कायम राखता न आल्याने तो बंधारा निकृष्ट दर्जाचा ठरला व वाहून गेला त्यामुळे एकाच कामांकरिता परत निधी प्राप्त करणे हि बाब अत्यंत कठीण होती परंतु आमदार कुणावार यांनी मागील दहा वर्षांपासून सातत्याने या बंधारासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करत वेळोवेळी संसदीय आयुधांचा वापर करत शासनाला सदर बंधाऱ्याच्या कामाबाबत लक्ष वेधतं शासनाकडून निधी प्राप्त करून घेतला आज त्या कामांचे भूमिपूजन करताना अतिशय समाधान होत असून आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहण्यांचा असल्याचे भावनिक उदगार काढले .
माझ्या हिंगणघाटकर जनतेला दिलेल्या शब्दांच्या पुर्तेते करीता एक पाऊल पुढे टाकले असून लवकरच सदर बंधाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाल्यावर चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्णत्वास येणार असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता टोंगसे यांनी केले तर संचालनासह उपस्थितांचे आभार प्रा. किरण वैद्य यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील गणमान्य नागरिक ,माजी नगरसेवक, नगर परिषदचे अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.