मुले शाळेत भरती करतांना ” हाय हाय” आणि नंतर पालकांना “बाय बाय”
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपीपरी:- तालुक्यातील धाबा येथील जनता विद्यालय येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे शाळेत चक्क सिमेंट कांक्रेटच्या कामात विद्यार्थांना मजुरीची काम करण्यास लावल्याचा व्हिडिओ समोर आल्याने विद्यार्थांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत प्रवेश देण्यात आला की बांधकाम मजूर म्हणून प्रवेश देण्यात आला अशा प्रश्न आज नागरिकांना पडला आहे.
गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथील जनता विद्यालय येथे परिसरातील पालक आपल्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवतात कारण शिक्षण घेऊन त्यांचे मुल त्याच उज्वल भवितव्य निर्माण करेल पण जेव्हा विद्यार्थ्याच उज्वल भवितव्य निर्माण करणारी शाळात त्यांना बांधकाम मजूर म्हणून कामाला लावत असेल तर ही शाळा विध्यार्थी निर्माण करत आहे की बांधकाम मजूर निर्माण करणारी शाळा आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गावातील नागरिकात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, डोंगरगाव येथील त्याच शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांने शाळेत आज भेट दिली असता त्या शाळेतील मुख्याध्यापक यांनी त्या मुलांना अपशब्द बोलून शाळेतुन बाहेर काढले. अशा प्रकारे माजी विद्यार्थांचे शाळा प्रशासनाने अपमान केला. यावेळी महाराष्ट्र संदेश न्यूज प्रतिनिधी राजेंद्र झाडे यांनी शाळेतील मुख्याध्यापक यांच्याबरोबर फोन वर बोलणं झालं पण यावर शाळा प्रशासनाने कुठलंही ठोस उत्तर दिले नाही. एक व्हिडिओ क्लिप त्या शाळेतील मुले सीमेंट कांक्रेटचे काम करतांना वायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आणि शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.