सिंदी रेल्वे विभागातील हजारो नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात भव्य पक्ष प्रवेश.
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून अनेकांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. त्यात हिंगणघाट विधानसभा मतदार संघात येणाऱ्या सिंदी रेल्वे येथून पन्नास गाड्यांच्या ताफ्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश करण्यासाठी सिंदी रेल्वे कर झाले हिंगणघाट शहरात दाखल झाले होते. यावेळी ढोल ताशाच्या गजरात हिंगणघाट शहरात रॅली काढून अतुल वांदिले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला हजारोंच्या संखेने पक्षप्रवेश कार्यकर्त्यांच्या उत्साहात झालेले आहे या अनोख्या पक्षप्रवेशाची हिंगणघाट शहरात व सिंधी रेल्वे शहरात जोरदार चर्चा..
27 सप्टेंबर रोजी शुक्रवारला सिंदी रेल्वे मतदारसंघातील हजारो लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश सोहळा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा भव्य पक्षप्रवेश सोहळा महावीर भवन हिंगणघाट येथे झाला. आमच्यासोबत इतके लोक जोडले जात आहेत, यामुळे आम्हाला पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी ऊर्जा मिळत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मतदारांसमोर एक चांगला पर्याय उपलब्ध असेल असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितलं.
यापक्षप्रवेश सोहळ्याला हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.