वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथील हडपसर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येते एका 14 वर्षीय गतीमंद मुलगी घरात एकटी असताना एका नराधमाने मुलीवर बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या असून शफिक शौकत अन्सारी वय 42 वर्ष रा. नाईकनवरे सोसायटी, ससाणेनगर, हडपसर असे अटक केलेल्याचे नाव आहे.
29 सप्टेबर रोजी दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास शफिक शौकत अन्सारी याने 14 वर्षीय गतीमंद मुलगी घरात एकटी असण्याची संधी साधत या नराधमाने मुलीवर बलात्कार केला. याबाबत एका 55 वर्षाच्या आजीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 14 वर्षाची नात एकटीच घरी होती. तिची समजशक्ती कमी आहे. असे असताना शफिक अन्सारी हा घरात शिरला. त्याने घराच्या दाराची कडी आतून लावून घेतली. 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो सह अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून अन्सारीला अटक केली आहे, सहायक पोलीस आयुक्त राख तपास करीत आहेत.
Minor Girl Rape Case, Hadapsar Police