पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- विदर्भातील प्रसिद्ध अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ‘एम्स’ वैद्यकीय संस्थेतून एक खळबळजनक माहिती समोर आली. येते घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी मिळून एका ज्युनियरची रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एम्समध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे परत एकदा रॅगिंग चे भूत पाहायला मिळले आहे.
प्राप्त माहितीनुसार, या दोन विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्याला अश्लील फिल्म दाखवून त्याचे कपडे काढून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेवटी घाबरलेल्या विद्यार्थ्याने आवाज करून स्वतःला वाचवले. याप्रकरणी सोनेगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विद्यार्थ्यांमध्ये दिव्यांशु राठोड आणि अमन अहलावत यांचा समावेश आहे. हे दोघेही B.Sc (MLT) चे विद्यार्थी आहेत. 21 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता आरोपीने पीडित विद्यार्थीला केशव वसतिगृहाच्या खोलीत बोलावले होते. त्यानंतर पीडित विद्यार्थिला एका खोलीत बंद केल्यानंतर दोघांनी त्याला पहिल्या 5 पॉर्नस्टारची नावे विचारली आणि नंतर गर्भधारणेशी संबंधित प्रश्न विचारले. यानंतर त्याला अश्लील फिल्म दाखवून त्याचे कपडे काढण्यास लावले. घाबरलेल्या विद्यार्थाने आरडाओरडा सुरु केला. हा आवाज ऐकून वसतिगृहातील इतर विद्यार्थी धावून आले. मात्र त्यानंतरही रात्री उशिरा आरोपी विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थीला तक्रार न करण्याची धमकी दिली. यामुळे पीडित विद्यार्थी चांगलाच घाबरला होता.
पिढीत विद्यार्थ्याने हिंमत करून दोन दिवसांनी एम्सच्या अँटी रॅगिंग समितीकडे तक्रार केली. समितीने हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी सुरू केली.च्या समितीने वसतिगृहातील 13 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले. या तपासात पीडित विद्यार्थाच्या रॅगिंगचे प्रकरण समोर आले. अखेर समितीने नियमानुसार दोन्ही विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अँटी रॅगिंग समितीचे सदस्य व प्राध्यापक सचिन रमेश चौधरी यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंध कायदा आणि भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 127 (2), 351 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.