मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
*सिरोंचा:-* तालुक्यातील बालमुत्यमपल्ली येथील रहिवासी तसेच राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे कट्टर समर्थक श्री.पाले चंद्रय्या यांची मातोश्री(आई) ही अनेक महिन्यापासुन दीर्घ आजाराने असल्याने त्यांचे निधन झाले. पण कुटुंबातील आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तेरवीचा कार्यक्रम करण्यासाठी आर्थिक प्रश्न ? निर्माण झाला होता.
पण स्थानिक कार्यकर्ते यांनी पाले चंद्रय्या यांची आर्थिक अडचणी विषयी प्रश्न अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या पर्यंत पोहोचविली त्यावेळी राजे साहेबांनी आपले स्थानिक कार्यकर्ते पाठवून तेरवी कार्यक्रमासाठी पाले चंद्रय्या यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत केली. त्यावेळी पाले चंद्रय्या यांच्या कुटूंबाने राजे साहेबांचे आभार मानले.!
यावेळी शंकर नरहरी भाजपा तालुका अध्यक्ष सिरोंचा तथा उपसरपंच ग्रामपंचायत पेंटींपाका, तालुका उपाध्यक्ष चंद्रन्ना सदनपू, सडवली लंगारी, बुथ प्रमुख महेश दंदेरा तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.