अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये राज्यस्तरीय शालेय जुदो क्रीडा स्पर्धाचे आयोजन श्री.शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी पुणे करण्यात आले. 27 व 28 सप्टेंबर 2024 ला आयोजीत स्पर्धेत मध्ये 14 वर्षे वयोगट 45 वजन गटांमध्ये राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत गोल्ड मेडल घेऊन ओजस सुकळकर यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेकरिता झालेली आहे.
ओजस सुकळकर हा हिंगणघाट येथील सेंट जॉन हायस्कूल येथे वर्ग आठवी चां विद्यार्थी आहे. दिनांक 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलात पूर्ण करून तो दिनांक 4 ते 08 ऑक्टोबर 2024 दरम्यान सरदार पटेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मेहसाणा गुजरात येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
यावेळी ओजस सुकळकर याने आपल्या यशाचे श्रेय निर्भय स्पोर्ट अकॅडमीचे प्रशिक्षक सुबोध महाबुधे, विशाल कस्तुरे, स्मिथ श्रावने अन्य सर्व प्रशिक्षक, सहकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर प्रीती जॉर्ज, उपमुख्याध्यापिका सिस्टर्स शांती तसेच आई-वडील नितीन सुकळकर, लिना सुकळकर व आजी यांना दिले आहे.
त्याच्या या यशाबद्दल त्याचे अभिनव विचार मंच हिंगणघाट कडुन प्रा.अजय बिरे, प्रसाद पाचखेडे, नितीन सुकळकर, विजय धात्रक, चंद्रशेखर रेवतकर, ओमप्रकाश मुडे, विकास नागरकर, श्रीकांत डोळसकर, सारंग चरडे, अजय भांडे, चंद्रशेखर दाते, जयंत देवडे, विकास सोनकुसरे, विशाल मुटे, बालु मुंडे, हेमंत ठवरी, हेमंत महाजन, बाबाराव मस्कर, परिमल शेंडे, निलेश बिडकर, योगेश्वर कलोडे, अरविंद दाहापुते, मिलिंद सवारकर, संजय खत्री, किरण गहरवार, राजेंद्र मोघे, शरद वाघमारे, यादव पोटरकर, श्याम खत्री, पौर्णिमा धात्रक, प्राची ताई पाचखेडे, यानी अभिनंदन केले.