मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. सतीश धोबे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिंगणघाट तालुकाप्रमुख यांनी हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर कुणावर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सतीश धोबे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीकरिता आमदार समीर कुणावार यांची राजकीय लाचारी पत्करली असून या आमदारा एवढी राजकीय लाचारी आजपर्यंत कुठल्याही आमदाराकडून करतांना पाहण्यात आली नाही.
शिवसेना नेते सतीश धोबे पुढे बोलताना म्हणाले की, आमदार महोदय हे मागील दहा वर्षापासून या हिंगणघाट विधानसभा -४६ या भागाचे नेतृत्व करीत आहे. त्यांच्या या कार्यकाळात झालेल्या विकास कामाच्या स्वरूपात त्यांनी जनतेसमोर जावून मत मागायला पाहिजे. तशीही त्यांनी स्वयंघोषित कार्यसम्राट, काही न करता शिल्पकार, दोनशे अठयांशी आमदारापैकी एकमेव उत्कृष्ट विदर्भातील संसदपटू म्हणून आपल्या नेत्याकडून ही उपाधी मिळून घेतली. या वेक्तीने जनतेसमोर आपल्या विकास कार्यावर मत मागितले पाहिजे. परंतु आमदार महोदय असे न करता या मतदारसंघात जाती – जातीचे , धर्मा – धर्माचे व गटा – गटात अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करून मतदान मिळविण्याकरिता हा केविलवाणा प्रयोग सुरू केलेला दिसून आले आहे.
काही दिवसापूर्वी आमदार( सम्राट) बोलत असे कि माझ्या समोर दूर दूर पर्यन्त माझा विरोधक नाही आणि मला कोणीही पुढे पाडू शकत नाही आणि त्या तोऱ्याच्या भारात कार्यकर्त्यांना कमी आखण्याची चुक करू लागले आणि जे उपरे लोक आहे त्यांना कामे मिळाली आणि विरोधाचे वातावरण स्वतःच्या पक्षात हळूहळू तयार झाले. आपण विचार करा कि याबद्दल आमदार महोदयांना या स्थराला का यावं लागलं ? त्याबाबत बारकाईने विचार केला तर, असे लक्षात येते की, त्यांच्या स्वपक्षाच्या सर्वसामान्य अथवा प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले कार्यकर्ते, ज्यांची कुठलीच अपेक्षा नसतांना सुद्धा, त्यांना पक्षाच्या निवड प्रक्रिया मध्ये मतदान करण्याचा अधिकार सुद्धा दिला जात नाही आणि त्यांचा सन्मान होत नाही. तरी असे निष्ठावात कार्यकर्ते पक्षाचे काम प्रामाणिक करून सुद्धा त्यांना मत आणि मतदानाचा अधिकार नाही असा ऐवढा अपमान या कार्यकर्त्यांना कसे सहन होईल आणि म्हणून असे सर्व अपमानित झालेले कार्यकर्ते आप – आपल्या घरी बसून आहे. तर काही स्वाभिमानी मंडळी काही वेगळा विचार करण्याच्या मानसिकतेत आहे. हे लक्ष्यात आल्यामुळे आमदार महोदयांना आता वाटायला लागले की, मला असल्या लोकांमुळे पुढे अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून असल्या लाचारीचे काम सुरू केले आहे.
बंधुंनो, आपण लक्षात घ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम ला मंजूर झाले . तसेच खैरे कुणबी समाजातील एका वर्गाला सभागृह बांधकाम करणेकरिता शासनाच्या वतीने हिंगणघाट येथे रू : ८० लक्ष रुपये मंजूर करून दिले. परंतु सदर सभागृह हे बिन मालकाचे आहे. कारण त्यावर अधिकार त्या ग्राम पंचायतीचा आहे या समाज बांधवांना साधा एक चौकीदार ठेवण्याचा अधिकार नाही तशीच परिस्थिती तेली समाजाची आहे. कारण त्यांना सुद्धा सभागृह बांधण्याकरिता रू : ३० लक्ष रुपये शासनाच्या वतीने मंजूर करून दिले . ते सुध्दा सभागृह बिन मालकाचे आहे .या दोन्ही समाजाचे कपोलकल्पित समर्थक नेते यांनी दोन्ही समाजाला या आमदार महोदयांच्या दावणीला बांधले की काय ? असे त्यांचे काही नेतेगण म्हणतात. कोणताही समाज कोणाच्या पैशावर ,ताकतीवर कोणाच्याही दावणीला बांधून राहू शकत नाही . जर असे असते तर, या दोन मोठ्या समाजाने माजी आमदार श्री.वसंत बोंडे तथा श्री. अशोक शिंदे आणि श्री. राजू तिमांडे यांना समाजाने कधीही शिखरावरून खाली आणले नसते . पण एक गोष्ट मात्र नक्की कि या तिन हि माजी आमदार महोदयांनी कधीच जाती पातीचे राजकारण इतक्या खालच्या स्तरावर केले नाही. परंतु या आमदाराकडून तो या दोन्ही समाजाच्या काही विकत घेतलेले ठेकेदाराच्या माध्यमातून या दोन समाजाचा सर्वात मोठा अपमान करीत आहे.हे त्या समाजातील लोकांना पुढे कडेल.
या स्वयंघोषित कार्यसम्राटानी समाजातील काही बेकाऊ ठेकेदाराला काही अमिश देऊन आपल्या कडे करून घेतले, जे लोक समाजाला आपल्या स्वतःच्या स्वार्थांकरिता नेत्याच्या दावणीला बांधण्याचे असे कृत्य करतांना मागे पुढे काहीच बघत नाही. असल्या या ठेकेदारवृत्ती असलेले समाजातील विघ्न संतोषी लोकांना समाजात कुठेही काडीमात्र स्थान नाही. एवढेच नाही तर, या आमदार महोदयांनी वांढेकर कुणबी समाजाचा सुध्दा मेळावा समुद्रपूर ला घेतला. या मेळाव्यात या समाजाचा कुठल्याही वयोवृद्ध किंवा सन्माननीय व्यक्ती यांना त्या मेळाव्यात अध्यक्षीय स्थान द्यायला हवं होतं. परंतु असे न करता या मेळाव्यात भलत्या समाजाच्या व्यक्तीला अध्यक्षीय स्थान देण्यात आले. यामुळे समाज मोठा अपमानित व शोकांतिकाच आहे. आमदार समीर कुणावार यांच्या दहा वर्षाच्या कारकीर्दीत मोठया प्रमाणावर वाळू चोरी, दारू, गांजा व इतर आमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात होतांना जनता पहात आहे हा विकास मोठ्या प्रमाणावर झाले हे जनता सांगू शकेल पण हे सर्व या तालुक्यात कुणाच्या आशीर्वादाने होत आहे ? हे जनतेला दिसून आले आहे. सदर विषयाकडे जनता ही आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे. महाविद्यालय तसेच माध्यमिक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी व तरुण मित्रांना या वाईट व्यसनाने घेरले आहे. त्यांच्या या व्यसनामूळे परिवारातील इतर सदस्यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अश्या या महत्त्वाच्या विषयावर सुद्धा हे आमदार महोदय कडून काहीच कारवाई करण्याची मानसिकता प्रशासकीय अधिकाऱ्याकडून करून घेतांना दिसून येत नाही. शासन – प्रशासन यांच्यासोबत बसून अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याची मानसिकता अजिबात नाही.
तर एकच काम, एकच लक्ष स्थानिक नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था येथील विविध योजनेच्या कामाला त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी, कर्मचारी व कॉन्ट्रॅक्टर यांना जबरदस्तीने सांगायचे की, “स्थानिक आमदार यांच्या अथक प्रयत्नाने” हे काम मंजूर करण्यात आले असे पत्रिकेत, बॅनर, बोर्ड वर लिहा. त्यांचा हा “मी पणा” आज त्यांना पुढे त्यांच्या कार्यकर्त्याकडून, जनसामान्य नागरिक, माजी नगरसेवक, नगरसेविका ह्या अडचणी पुढे निर्माण करणार आहे.
बंधुनो आपण जागरूक नागरिक आहात. समाजातील काही ठेकेदार मंडळींना असे वाटते की, समाज हा आमदार समीर कुणावार याच्या दावणीला बांधून ठेवला कि आपले अस्तित्व बनते. भावांनो, आता हीच वेळ आली आहे. असल्या लोकांना आणि त्यांच्या नेत्यांना आता जागा दाखवावीच लागेल. असे मत सतीश धोबे, तालुकाप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हिंगणघाट यांनी मांडले.