मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे जिल्हा पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, किसान सेवा समिती, युवा भारत ट्रस्ट च्या वतीने गांधी जयंती निमित्ताने 2 आक्टोंबर ला सकाळी हिंगणघाट बसस्थानक येथे स्वच्छता अभियान वसंतराव पाल गुरुजी जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान ट्रस्ट वर्धा जिल्हा यांचे नेतृत्वात राबविण्यात आले आहे. या स्वच्छता अभियान प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, राजा महाराज शेंडे, डॉ. गंगाधर नाखले, ज्ञानेश्वर खडसे, प्रा.अजय मोहोड उपस्थित होते.
स्वच्छतेच्या दिशेने उचललेले एक पाऊल देशाला ऊज्वल भविष्याकडे घेऊन जाणार आहे याची जाणीव मनात ठेऊन स्वच्छतेचे व्रत अंगीकारणारा परिसरात जल, ध्वनी, वायु प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी केले. वसंतराव पाल गुरूजी बोलताना म्हणाले की, पतांजलिच्या वतीने समाजोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पतांजलिच्या वतीने दर रविवारी सकाळी स्थानिक मोक्षधामाची साफसफाई करण्यात येत आहे. शहरातील मोढे मंदिरात तसेच यात्रा उत्सव संपल्यानंतर पतांजलि परीवाराचे वतीने नियमित स्वच्छता उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. स्वच्छते बरोबर तन- मन- विचार सुदृढ निरोगी राहण्यासाठी आपले दिनचर्येत बदल करून नियमितपणे योग प्राणायाम करण्याचा सल्ला जेष्ठ योग शिक्षक ज्ञानेश्वर खडसे यांनी दिला. या कार्यक्रमाचे संचालन, आभार राजा महाराज शेंडे यांनी केले. यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
महात्मा गांधी जयंती निमित्ताने आयोजित या सफाई अभियाना पतांजलि योग समितीचे सदस्य प्रमोद भाईमारे, सुरेश दविले, प्रा. अनिल तरोडकर, योगेश सुंकटवार, सुनिल डांगरे, उत्तम लांबट, परमेश्वर खडसे, वासुदेव अनिल राजपांडे, आयुष हावगे, राजू भगत, रवि भालेकर, सुधाकर सायंकार, रामानंद चौधरी, वैभव निनावे, वासुदेव डेहने, मनोहर झोंटिग, शिवाजी कलोरकर, राजू मानकर, शरद बाकरे, वामनराव तडस, केशवराव हिवरकर, पुरणलाल जयस्वाल, दिलीप घिय्या तसेच सुचिता पुडके, अरूणा जयकुमार लोखंडे महामंडळ कर्मचारी सहभागी झाले होते.