आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नुसते गांधीच्या प्रतिमेचे पूजन करून चालणार नाही. गांधीजींचे विचार समाजाने आत्मसात करायला हवे. शांतीच्या मार्गाने युवकांनी आणि युवतीनी कास धरावी असे प्रतिपादन कामगार नेते डॉ. उमेश वावरे यांनी केले. ते हिंगणघाट येथे 2 आक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्य आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी अभय खोब्रागडे, मनीष कांबळे, जीवन उरकुडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. उमेश वावरे यांनी हिंगणघाट येथील चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात युवक, युवतींना मार्गदर्शन करितांना बोलत होते.ते पुढे बोलतांना म्हणाले की गांधी एक विचार आहे. समाजाने गांधींच्या विचाराचा आदर करावा. समाजात रुजवावे. यासाठी प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. यावेळी शेकडो युवक, युवती कार्यकर्ते उपस्थित होते.