मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 30 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वैशिष्टपूर्ण उपक्रमा अंतर्गत व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजाचा विकास कसा होईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र हिंगणघाट आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उपकल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली तसेच कामगार कल्याण अधिकारी अळणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ जयश्री खिल्लारे प्रमुख पाहुणे सौ. सपना हरडे, व्याखाते सौ.कविता शेरकी (घोडे) विषय साधन व्यक्ती पंचायत समिती हिंगणघाट यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रेरणा चिपडे यांनी स्पर्धा परीक्षा वर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ.शैला टोंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन निखिल मेश्राम यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक तरुणी तरुणी उपस्थित होत्या.
.