रविंद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- भारतीय जनता पार्टीचे परतूर आष्टी सरचिटणीस तसेच आष्ठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामप्रसाद किसनराव थोरात यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत वंचित बहुजन आघाडी पक्षात बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
आज वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी प्रदेश महासचिव प्रा किशन चव्हाण, अँड अरुण आबा जाधव यांच्या उपस्थितीत पंचायत समिती परतुरचे उपसभापती रामप्रसाद थोरात यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी उपस्थित ओबीसी समन्वयक अध्यक्ष सुंदरलाल बागिनवाल, वाजुळे सरपंच, माऊली मानवतकर, कार्याध्यक्ष परमेश्वर खरात जिल्हा माहासचिव डॉ. किशोर त्रिभुवन, जिल्हा उपाध्यक्ष सतिष खरात मंठा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, परतुर तालुकाध्यक्ष रवींद्र दादा भदर्गे यावेळी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हाच्या वतीने रामप्रसाद थोरात यांच स्वागत व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.