*दीना नदीवरील पुलासह इतर चार पुलांचा समावेश*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
अहेरी: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात रस्ते आणि उड्डाणपूलांच्या निर्मितीचे काम सातत्याने सुरू आहे. त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 353-सी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम केले जात आहे.लगाम-खमनचेरू-आलापल्ली दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर रोजी करण्यात आले.!!
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम,तहसीलदार बालाजी सोमवंशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोने,कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख,आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम,जेष्ठ कार्यकर्ते मलरेड्डी येमनूरवार,सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने,कैलास कोरेत,जाकीर सय्यद, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
लगाम-खमनचेरु-आलापल्ली एन एच 353-सी चे जवळपास 28 किलोमीटर अंतरचे उन्नतीकरण व काँक्रीटीकरण काम 182 कोटींच्या निधीतून केले जाणार आहे.यात दीना नदीवरील मोठा पूल आणि इतर चार पुलाचे देखील बांधकाम केले जाणार आहे.विशेष म्हणजे आष्टी पासून सिरोंचा पर्यंत रस्त्याचे बांधकाम मंजूर होऊनही बांधकाम करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.वेळोवेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.एवढेच नव्हेतर वन विभागाचे नाहरकत मिळविण्यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले.या मार्गावरील बरेच ठिकाणी डांबरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.4 ऑक्टोबर रोजी नागेपल्ली येथील साई ढाबा जवळ उर्वरित रस्ता बांधकामाचे भूमिपूजन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.
मागील काही वर्षांपासून आलापल्ली ते आष्टी दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. संबंधित कंत्राटदाराने या कामासाठी प्लांट देखील उभारले.मात्र पावसामुळे कामाला सुरुवात करण्यात आले नव्हते.आता पावसाने विश्रांती घेताच या कामाला सुरुवात करण्यात येत आहे.सदर रस्ता बांधकाम पूर्णत्वास आल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.त्यामुळे सदर रस्ता बांधकाम दर्जेदार करण्याचे निर्देश मंत्री आत्राम यांनी संबंधित कंत्राटदाराला दिली आहे.
*मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मानले आभार*
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन मोठी निधी दिली.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार यांचा देखील सहकार्य लाभला.त्यामुळे मंत्री आत्राम यांनी सर्वांचे आभार मानले.